MPSC UPDETAS
PSI शारीरिक परीक्षेच्या निकषांमध्ये बदल!!
MPSC Bharti 2021
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ने पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI भरतीतील शारीरिक परीक्षेच्या निकषांमध्ये बदल केले आहेत. हे सुधारित निकष २०२० च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षेपासून लागू होणार आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Service Public Commission – MPSC) म्हणजेच एमपीएससीने पोलिस उपनिरिक्षक (मुख्य) (PSI Mains) अर्थात ‘पीएसआय’ पदाच्या भरतीसंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, यापुढे पीएसआय पदाची मुलखात देण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 गुणं मिळवणं आवश्यक आहे, अशी माहिती आयोगाने परिपत्रक काढत दिली आहे.तसेच पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या शारीरिक चाचणीत 60 गुण असतील तरच उमेदवाराला मुलाखत देता येणार आहे. म्हणजेच उमेदवाराच्या पात्रतेसाठी फक्त मैदानी गुण गृहीत धरले जाणार आहेत. याआधी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते. मात्र आता अंतिम गुणवत्ता यादीतून शारीरिक चाचणीचे गुण वगळण्यात आले आहेत. हे गुण आता फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
उमेदवाराने पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा दिल्यानंतर त्याला मैदानी परीक्षेत जर 60 गुण मिळाले तर त्याला मुलाखत देता येणार आहे. हे नवे नियम 2020 मध्ये निघालेल्या जाहीराला लागू असणार आहेत. याआधी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते. मात्र आता ते शारीरिक चाचणीचे गुण अंतिम गुणवत्ता यादीतून वगळले आहेत. आता इथून पुढे ते फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत, अशी माहिती आयोगाने दिली आहे.