पुणे विद्यापीठाच्या सत्र २ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू Pune University Exams 2021

 



पुणे विद्यापीठाच्या सत्र २ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

Pune University Exams

पुणे– पुणे विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परराज्यात किंवा परदेशात उच्च शिक्षण, संशोधनासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन सत्र परीक्षा जूनमध्ये घेण्याचे नियोजन केले आहे.

या परीक्षेचा संपूर्ण निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर करून विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक कागदपत्रे तातडीने देण्यात येणार आहेत. त्यामुळे अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी विद्यापीठांच्या सत्र परीक्षांबाबत राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सत्र परीक्षांच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

पुणे विद्यापीठाकडून साधारण १० ते १५ मे या कालावधीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. विद्यार्थ्यांना साधारण ३१ मेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर १५ जूनपासून अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. या परीक्षांचा निकाल ३१ जुलैपासून जाहीर होण्यास सुरुवात होईल. कोणतीही अडचण उद्भवली नाही, तर संपूर्ण अभ्यासक्रमांचे निकाल १५ ऑगस्टपर्यत जाहीर होतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.