PCMC पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 10 वी पास आशा वर्कर्सची महाभरती सुरु |PCMC aasha Worker Bharti 2023
PCMC-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविक पदाची मेगाभरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्टची तब्बल 154 पदे भरावयाची आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता केवळ दहावी उत्तीर्ण अशी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया विविध रुग्णालयात 26 एप्रिल 2023 ते 4 मे 2023 या दरम्यान आयोजित केली आहे.
पदाचे नाव – अॅक्रेडिटेड सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्ट (आशा स्वयंसेविका)
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण
नोकरीचे ठिकाण – PCMC/पुणे
वयाची अट – 25 ते 45 वर्षे
निवड प्रक्रिया – सरळ मुलाखतीद्वारे
अनुभव – संबंधित लोकसंख्येमध्ये यापुर्वी लिंक वर्कर कार्यरत असल्यास व ते लिंक वर्कर आशा स्वयंसेविका म्हणुन काम करण्यास इच्छुक असल्यास लिंक वर्करची आशा स्वयंसेविका म्हणुन निवडीसाठी प्राधान्य देण्यात येईल.