पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी | सरळ भरती सुरु। PCMC Bharti 2023
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत असणारे नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, ह.भ.प. कै. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय, आकुर्डी व नवीन भोसरी रुग्णालय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (तालेरा रुग्णालय), यमुनानगर रुग्णालय व सांगवी रुग्णालय व इतर ठिकाणी कामकाजाकरिता पात्र व इच्छुक तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी करारनामा करून ११ महिने कालावधीसाठी पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या रुग्णालयांतील विविध विभागांकरिता आवश्यकतेनुसार नियुक्ती करण्यासाठी दिनांक १५/०५/२०२३ ते दिनांक- १७/०५/२०२३ अखेर सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत, तसेच त्यापुढील प्रत्येक सोमवारी रिक्त जागांनुसार खालील पदांसाठी मार्किंग पॅटर्ननुसार, गुण व आरक्षणनिहाय, थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
एकुण जागा /Total Post – 203 जागा
पदाचे नाव – कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार, हाऊसमन, भूलतज्ञ विभाग कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार,, बालरोग विभाग (कन्सल्टंट) ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, बालरोग विभाग (हाऊसमन), मेडीसिन/ फिजिशिअन (कन्सल्टंट), मेडीसिन / कन्सल्टंट रजिस्ट्रार, रेडिओलॉजिस्ट (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, सर्जन (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार. आर्थोपेडीक सर्जन (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार, नेत्रतज्ञ (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, कान, नाक, घसा (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे
वयाची अट – 58 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण – वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी १८
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी १८
मुलाखतीची तारीख – 15 ते 17 मे 2023